सागर साबडे - लेख सूची

तुम्ही कुठल्या इंडियातले?

वीर दास ह्या विनोदी अभिनेत्याने “I come from two Indias” नावाचे कवितावजा स्फुट अमेरिकेतील वॉशिंग्टन डी सी येथील केनेडी सेंटरमध्ये नोव्हेंबरमध्ये सादर केले व त्याची दृकश्राव्य फीत समाजमाध्यमांद्वारे प्रसारित केली. ह्या घटनेने एकच हलकल्लोळ उडाला. त्यानं सादर केलं आहे त्यावर “कसला भारी बोलला हा” इथपासून ते “कोण हा टिकोजीराव? ह्याला कुठे काय बोलावे याची काही अक्कल तरी आहे का?” इथपर्यंत सर्व तऱ्हेच्या प्रतिक्रिया आल्या. ध्रुवीकरण …